अंबुला विकुनी पवित्र झाली ।


अंबुला विकुनी पवित्र झाली । पोटीचीं बाळें कौतुकीं मारिलीं ॥१॥
पापा वेगळी मी जाले वो नारी । विठ्ठला घरीं नादंतसे ॥२॥
आशा तृष्णा नणंदा मारिल्या । शेजारीं राहविल्या संतसंगें ॥३॥
बापरखुमादेवीवर विठ्ठल भोगिला । मज पैं लाधला गुणेविण ॥४॥





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers