अंजनाचे अंजन सदोदीत पाहिले |


अंजनाचें अंजन सदोदीत पाहिले । पाहाणें होऊनी ठेलें सर्वाठायीं ॥१॥
आतां बोलाबोली नको बा आणिक । बिंदु तो नि:शंक ब्रह्म रया ॥२॥
अनुहात उन्मनी म्हणोनी व्यर्थ काय । मुखीं धरी सोय ब्रह्मरंध्री ॥३॥
ज्ञानदेव म्हणे न बोले आणिक । डोळीयांची वाल पाहतांची ॥४॥





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers