Showing posts with label ॐ नमोजी शिवा । नमो तुज महादेव करुन. Show all posts
Showing posts with label ॐ नमोजी शिवा । नमो तुज महादेव करुन. Show all posts

ॐ नमोजी शिवा । नमो तुज महादेव करुन

ॐ नमोजी शिवा । नमो तुज महादेव करुनी
उपकार जीवा । अवतार धरिला ॥१॥
सोपा मंत्र रामनाम । तेणें झालें सर्व काम ।
साधनांचा श्रम । गोवा उगविअला ॥२॥
बैसनियां दृढासनीं । नाम जपे निशिदीनीं ।
तयासी अवनीं । सोपी दिसे ॥३॥
बरवें साधन उत्तम । अवघा निवारिला श्रम ।
गातां तुमचें नाम । वंद्य तिहें लोकीं ॥४॥
जड जीव उद्धरिले । कलिमाजीं सोपें केलें ।
रामराम जप वहिलें । थोर साधन हें ॥५॥
अवतार धरुनी साचा । उद्धार केला जड जीवांचा ।
एका जनार्दनीं नामाचा । वाढविला महिमा ॥६॥

Labels

Followers