ताटीचे अभंग

योगी पावन मनाचा । साहे अपराध जनाचा ।।१।। विश्वरागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी ।।धृ.।। शब्द शस्त्रे झाली क्लेश । संती मानवा उपदेश ।।३।। विश्वपट ब्रम्हा दोरा । तटी उघडा ज्ञानेश्वरा ।।४।।

योगी पावन मनाचा । साहे अपराध जनाचा ।।१।। विश्वरागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी ।।धृ.।। शब्द शस्त्रे झाली क्लेश । संती मानवा उपदेश ।।३।।विश्वपट ब्रम्हा दोरा । तटी उघडा ज्ञानेश्वरा ।।४।।

वरी भगवा झाला नामे । अंतरी वश केला कामे ।।१।। त्याला म्हणू नाये साधू । जगी विटंबणा बाधू ।।२।। आपणा आपण शोधूणी घ्यावे। विवेक नांदे त्याच्या सवे॥३॥ आशा दंभ अवघे आवरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।४।।

संत तोचौ जाणा जगी । दया क्षमा ज्याचे अंगी ।।१।। लोभ अहंता नये मना । जगी विरक्त तोचि जाणा ।।२।। इह परलोकि सुखी । शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी ।।३।। मिथ्या कल्पना मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।४।।

एक अपण साधू झाले । येर कोण वाया गेले ।।१।। उठे विकार ब्रम्ही मुळ । अवघे मायेचे गाबाळ ।।धृ।। माया समुळ नुरे जेव्हा । विश्व ब्रम्ह होईल तेव्हा ।।३।। ऎसा उमज अदि अंती । मग सुखी व्हावे संती ।।४।। काम क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।५।।

ब्रम्ह जैसे तैश्या परी । आम्हा वडील भुते सारी ।।१।। हात आपुला आपणा लागे । त्याचा खेद करू नये ।।धृ.।। जीभ दातांनि चाविली । कोणे बत्तीसी ताडिली ।।३।। थोर दुखावले मन । पुढे उदंड शहाणे ।।४।। चणे खावे लोखंडाचे। मग ब्रम्हपदी नाचे ।।५।। मन मारूनी उनमन करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।६।।

सुख सागर आपण व्हावे । जग बोधे निववावे ।।१।। बोधा करू नये अंतर । साधु नाही आपपर ।।धृ।। नीव वीवासी पै द्यावा । मग करू नयै अंतर देवा ।।३।। तरणोपाय चित्री धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।४।।

अहो क्रोध यावे कोठे। अवघे आपण निघोठे ।।१।। ऎसे कळले उत्तम । जन तेची जनार्दन ।।धृ.।। ब्रीद बांधिले चरणी । नये दाविता करणी ।।३।। वेळ क्रोधाचा उगवला । अवघा योग फोल झाला ।।४।। ऎसी थोर दृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।५।।

संडी कल्पना उपाधी । तीच साधुला समाधी ।।१।। वाद घालावा कवणाला । अवघा द्वैताचा हो घाला ।।धृ.।। पुढे उमजेना काय । बुडत्याचे खाली पाय ।।३।। एक मन चेष्टा करी । भूते बापूडी शेजारी ।।४।। अवघी ईश्वराची करणी । काय तेथे केला कोणी ।।५।। पुन्हा शुद्ध मार्ग धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।६।।

गिरी गवहारे कशासाठी । रागे पुरविली पाठी ।।१।। ऎसा नसावा संन्यासी । परमार्थाचा जो का द्वेषी ।।धृ.।। घर बांधिले डोंगरी । विषया हिंडे दारोदारी ।।३।। काय केला योग धर्म । नाही अंतरी निष्काम ।।४।। गंगाजळ हृदय करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।५।।

शुद्ध ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ।।१।। अवघी साधन हातवटी । मोले मिळत नाही हाटी ।।धृ.।।अहो आपण तैसे व्हावे । अवघे अनुमानूनि घ्यावे ।।३।। ऎसे केले सतगुरूनाथे । बापरखुमादेवी कांते ।।४।। तेथे कोणी शिकवावे । सार साधूनिया घ्यावे ।।५।। लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुद्यल ठायीचे ठायी । ।६।। तुम्ही तरुनी विश्वतारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।७।।

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers