Showing posts with label संत नामदेव. Show all posts
Showing posts with label संत नामदेव. Show all posts

माझी रेणुका माऊली | Mazi renuka mauli - संत नामदेव ▌♫▐

माझी रेणुका माऊली । कल्पवृक्षाची साऊली ॥१॥
जैसी वत्सालागी गाय । तैसी अनाथांची माय ॥2॥
हाकेसरशी घाई घाई । वेगे धावतची पायी ॥3॥
आली तापल्या उन्हात । नाही आळस मनात ॥4॥
खाली बैस घे आराम । मुखावरती आला घाम ॥5॥
विष्णूदास आदराने । वारा घाली पदराने ॥6॥

Mazi renuka mauli । kalpawrikshachi sauli ॥१॥
Jaisi watsalagi gay । taisi anathanchi may ॥2॥
Hakesarashi ghai ghai । wege dhaawatachi payi ॥3॥
Ali tapalya unhat । nahi alas manaat ॥4॥
Khali bais ghe aram । mukhaawarati ala gham ॥5॥
Vishnudas adarane । vara ghali padarane ॥6॥





तूं माझी माउली मी बो तुझा तान्हा - संत नामदेव ▌♫▐

तूं माझी माउली मी बो तुझा तान्हा ।
पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे ॥१॥
तूं माझी गाउली मी तुझें वासरूं ।
नको पान्हा चोरूं पांडुरंगे ॥२॥
तूं माझी हरिणी मी तुझें पाडस ।
तोडी भवपाश पांडुरंगे ॥३॥
तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज ।
चारा घाली मत्र पांडुरंगे ॥४॥
कासवीची दृष्टी सदा बाळावरी ।
तैसी दया करीं पांडुरंगे ॥५॥
नामा म्हणे विठो भक्तीच्या वल्लभा ।
मागें पुढें उभा सांभाळिसी ॥६॥

Labels

Followers