Showing posts with label विठ्ठला रे तूं उदाराचा राव । संत तुकाराम ▌♫▐. Show all posts
Showing posts with label विठ्ठला रे तूं उदाराचा राव । संत तुकाराम ▌♫▐. Show all posts

विठ्ठला रे तूं उदाराचा राव । Vithhala re tu udaracha rav ▌♫▐

विठ्ठला रे तूं उदाराचा राव । विठ्ठला तूं जीव या जगाचा ॥१॥
विठ्ठला रे तूं उदाराची रासी । विठ्ठला तुजपाशीं सकळसिद्धी ॥ध्रु.॥
विठ्ठला रे तुझें नाम बहु गोड । विठ्ठला रे कोड पुरविसी ॥२॥
विठ्ठला रे तुझें श्रीमुख चांगलें । विठ्ठला लागलें ध्यान मनीं ॥३॥
विठ्ठला रे वाचे बोला बहुरस । विठ्ठला रे सास घेतला जीवें ॥४॥
विठ्ठला रे शोक करीतसे तुका । विठ्ठला तूं ये कां झडकरी ॥५॥

Vithhala re tu udaracha rav | Vithhala tu jiv ya jagacha ॥१॥
Vithhala re tuudaranchi rashi | Vithhala tujpashi sakal sidhhi ॥2॥
Vithhala re tuze nam bahu god | Vithhala re kod purvisi ॥3॥
Vithhala re tuze shrimukh changale | Vithhala lagale dhyan mani ॥4॥
Vithhala re vache bola bahuras | Vithhala re saas ghetala jive ॥5॥
Vithhala re shok karitase tuka | Vithhala re ye ka zadakari ॥6॥


Labels

Followers