Showing posts with label गौळणी - गेलिया वृंदावना तेथे - संत नामदेव ▌♫▐. Show all posts
Showing posts with label गौळणी - गेलिया वृंदावना तेथे - संत नामदेव ▌♫▐. Show all posts

गेलिया वृंदावना तेथे देखिला कान्हा । Geliya vrundavana tethe dekhila kanha

गेलिया वृंदावना तेथें देखिला कान्हा ।
संवगडिया माजी उभा ध्यान लागलें मना ॥१॥
हरिनाम गोड झालें काय सांगों गे माय ।
गोपाळ वाहती पावे मन कोठें न राहे ॥२॥
त्याचें मुख साजिरें वो कुंडलें चित्त चोरें ।
सांडुनी अमृत धनी लुब्धलीं चकोरें ॥३॥
सांडुनी ध्रुवमंडळ आली नक्षत्रमाळा ।
कौस्तुभा तळवटीं वैजयंती शोभे गळां ॥४॥
सांडुनी मेघराजु कटिसूत्नीं तळपे विजू ।
भुलला चतुराननू तया नव्हे उमजू ॥५॥
सांडुनी लक्ष्मी निज गोपाळासी बोले गुज ।
अचोज हा चोजवेना ब्रम्हांदिकां सहज ॥६॥
वांजट धीट मोठी ऐसी कवण असे खिळू ।
भेदली हरिचरणीं पायीं मुरडीव वांकी सोज्वळू ॥७॥
त्याचें पायींची नेपुरें वाजती वो गंभीरें ।
लुब्धलीया पक्षयाती धेनु पाचारी स्वरें ॥८॥
आणिक एक नवल कैसें स्वर्गीं देव झाले पिसे ।
ब्रम्हादिक उच्छिष्ठालागीं देखा जळीं झाले मासें ॥९॥
आणिक एक नवल परी करीं घेऊनि शिदोरी ।
सवंगडया वांटितसे नामया स्वामी मुरारी ॥१०॥





Labels

Followers