पारंपारिक आरत्या

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

गजानना मजवर राहु दे छाया ।
मजवर राहु दे छाया गजानना ॥

गौरी कुमार गजमुख वदना हासत नाचत ये ।
प्रभू तू धावत धावत ये ॥

गणराया लवकर येई । भेटी सकलासी देई ॥
नाचत आले गणपती । पायी घागुऱ्या वाजती ॥
अंगी शेंदुराची उटी । सकल ज्ञानाचा तू दाता ॥
देई ज्ञान मोरेश्वर । दास पदी लीन झाला ॥


श्री गणपतीची आरती

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जायची ॥
सर्वांग सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन:कामना पुरती । जय देव ॥धृ ॥
रत्नखचित फार तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुगुट शोभती बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥ जय देव ॥ २ ॥
लंबोदर पितांबर फणीवरबंधना ।
सरळ तोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥ जय देव ॥३ ॥


श्री गणपतीची आरती 2

शेंदूर लाल चढायो अच्छा गज मुखको ।
दोंदिल लाल विराजे सुत गौरीहरको ।
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको ।
महिमा काहे न जाय लागत हुं पदको ॥१॥
जय जय जी गणराज विद्यासुखदाता ।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥धृ॥
अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी ।
विघ्नविनाशक मंगल मुरत अधिकारी ।
कोटीसुरजप्रकाश ऐसी छबी तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झुले शशिबिहारी ॥जय॥२॥
भावभगतसे कोई शरणागत आवे ।
संतत संपत सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीवंदन निशिदिन गुण गावे ।
जय जय जी गणराज विद्यासुखदाता ॥ धन्य ॥३॥


श्री गणपतीची आरती 3

उंदरावरि बैसोनि दूडदूडा येसी ।
हाती मोद्क लाडू घेउनियां खासी ॥
भक्तांचे संकटी धावूनि पावसी ।
दास विनविती तुझियां चरणासी ॥ १ ॥
जय देव जय देव जय गणराजा ।
सकळ देवां आधी तूं देव माझा ॥ धृ.॥
भाद्रपदमासी होसी तू भोळा ।
आरक्त पुष्पांच्या घालूनिया माळा ॥
कपाळी लावूनी कस्तुरी टीळा ।
तेणे तू दिससी सुंदर सांवळा ॥जय देव.॥२॥
प्रदोषाचे दिवशी चंद्र श्रापीला ।
समयी देवे मोठा आकांत केला ॥
इंदु येवोनि चरणी लागला ।
श्रीराम बहुत श्राप दिधला ॥ जय देव.॥३॥
पार्वतीच्या सुता तू ये गणनाथा ।
नेत्र शिणले तुझी वाट पाहतां ॥
किती अंत पाहासी बा विघ्नहर्ता ।
मला बुद्धी देई तू गणनाथा॥जय देव.॥4॥


श्री गणपतीची आरती 4

नानापरिमळ दूर्वा शमिपत्रें ।
लाडू मोदक अन्नें परिपूरित पातें ।
ऐसें पूजन केल्या बीजाक्षरमंत्रें ।
अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ ध्रु० ॥
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरती ॥
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती ॥ जय देव० ॥२॥
शरणागत सर्वस्वे भजती तव चरणीं ।
कीर्ति तयांची राहे जोंवर शाशितरणी ॥
त्रैयोक्यों ते विजयी अद्भुत हे करणी।
गोसावीनंदन रत नामस्मरणी ॥ जय देव० ॥३॥


श्री गणपतीची आरती 5

जय देव जय देव जय वक्रतुंडा ।
सिंदुरमंडित विशाल सरळ भुजदंडा ॥ ध्रु०॥
प्रसन्नभाळा विमला करिं घेउनि कमळा ।
उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलीळा ॥
रुणझुण रुणझुण करिती घागरिया घोळा ।
सताल सुस्वर गायन शोभित अवलीळा ॥ जय देव० ॥१॥
सारीगमपधनी सप्तस्वरभेदा ।
धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा ॥
तातक तातक थैय्या करिसी आनंदा ।
ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा ॥ जय देव० ॥२॥
अभयवरदा सुखदा राजिवदलनयना ।
परशांकुशलड्डूधर शोभितशुभरदना ॥
ऊर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना ।
मुक्तेश्वर चरणांबुजिं अलिपरि करिं भ्रमणा ॥ जय देव ॥३॥


श्री गणपतीची आरती 6

आरती करु तुज मोरया।
मंगळगुणानिधी राजया॥ आरती॥धृ.॥
सिद्धीबुद्धीपती संकटनाशा।
विघ्ननिवारण तूं जगदीशा॥ आरती करुं.॥१॥
धुंडीविनायक तू गजतुंडा।
सिंदूरचर्चित विलसित शुंडा॥ आरती करुं.॥२॥
गोसावीनंदन तन्मय झाला।
देवा देखोनिया तुझ शरण आला॥ आरती करुं ॥३॥


श्री गणपतीची आरती 7

जय जय जय जय जय मोरेश्वरा ।
गिरिजात्मक जय जय विघ्नेश्वर ॥ जय जय० ॥
चिंतामणी तू श्री गणपती ।
वरद विनायक तू गणपती ॥जय जय० ॥
श्री सिद्धीविनायक तू गणपती ।
बल्लाळेश्वर तू गणपती ॥जय जय० ॥
अष्टविनायक निशिदिनि भज तू ।
तरशील तू हा भवसागर ॥जय जय० ॥


श्री गणपतीची आरती 8

विघ्नांत विघ्नेशा हे गजानना ।
आरती मी करितो तुज पुरवि कामना ॥ धृ. ॥
भाद्रपदी शुद्ध चतुर्थीस तव बरी।
मूर्ति करुनि सर्व लोक पूजिती घरी॥
महिमा तव वर्णवे न पापगिरि हरी॥
येई घाई करुनि त्वरा हे दयाघना ।
हे कृपाधना ॥आरती मी करितो॥ १ ॥
संकटि जे पडुनि प्रभो स्मरती तुजला ।
मुक्त करिसी जगती या खचित त्यांजला ॥
जाणुनि हे तव भजनीं ध्यास लागला ॥
गातो ध्यातो नमितो तुज हे दयाघना ।
हे कृपाधना ॥आरती मी करितो॥२ ॥


श्री गणपतीची आरती 9

त्राता तू गणराज अमुचा । त्राता तू गणराज । गणराज॥धृ॥
रिद्धी सिद्धी चा तू स्वामी । विघ्नहरा गणराज जगता ॥
चौशष्ठ विद्याशास्त्र कलांचा ।देवाचा अधिनाथ जगता ॥
मंगलमय हे नाम तुझे रे । ध्यातो मी गणराज जगता॥


श्री गणपतीची आरती 10

तूं सुखकर्ता तूं दुःखकर्ता विघ्नविनाशक मोरया ।
संकटीं रक्षीं शरण तुला मी, गणपतीबाप्पा मोरया ॥ ध्रु० ॥
मंगलमूर्ति तूं गणनायक । वक्रतुंड तूं सिद्धिविनायक ॥
तुझिया द्वारीं आज पातलों । नेईं स्थितिप्रति राया ॥ संकटीं० ॥१॥
तूं सकलांचा भाग्यविधाता । तूं विद्येचा स्वामी दाता ॥
ज्ञानदीप उजळून आमुचा । निमवीं नैराश्याला ॥ संकटीं० ॥२॥
तूं माता, तुं पिता जगं या । ज्ञाता तूं सर्वस्व जगीं या ॥
पामर मी स्वर उणें भासती । तुझी आरती गाया ॥ संकटीं ॥३॥


श्री गणपतीची आरती 11

शिव सुता प्रेमे करू आरती ।
शिवसुता प्रती शिवसुता प्रती ।
शिव सुता प्रेमे करू आरती ।
गत काळातील कृत पुण्याई ।
अर्पित नैवेद्या ॥ करू आरती...
मम भूमीच्या कर्तव्याचा ।
कर्पूर लावी तव नामे ॥ करू आरती...
आगमनी निगमानी विचारूनी नियमे ।
प्रदक्षणा करू अभिरामे ॥ करू आरती...


श्री गणपतीची आरती 12

गणराया आरती ही तुजला ॥ धृ. ॥
रुणझुण पायीं वाजति घुंगूर । गगनी ध्वनी भरला ॥ १ ॥
भाद्रपद मासी शुक्लचतुर्थीसी । पुजिती जन तुजला ॥२॥
गंध पुष्प धुप दीप समर्पुनी ।अर्पिती पुष्पांला॥३॥
भक्त हरी हा आठवितो रुप । गातो तव लीला ॥४॥


श्री गणपतीची आरती 13

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा ।
माता जाकी पारवती पिता महादेवा ॥
एकदन्त दयावन्त चारभुजाधारी |
माथे पर तिलक सोहे मूसे की सवारी ।
पान चढ़े फल चढ़े और चढ़े मेवा |
लड्डुअन का भोग लगे सन्त करें सेवा ॥
अंधे को आँख देत कोढ़िन को काया |
बाँझन को पुत्र देत निर्धन को माया ।
'सूर' श्याम शरण आए सफल कीजे सेवा |
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा ॥


श्री गणपतीची आरती 14

गजानना श्रीगणराया । आधी वंदू तुज मोरया ॥
मंगलमूर्ति श्री गणराया । आधी वंदूं तुज मोरया ॥१॥
सिंदुर-चर्चित धवळी अंग । चंदन उटी खुलवी रंग ॥
बघता मानस होते दंग । जीव जडला चरणीं तुझिया ॥२॥
गौरीतनया भालचंद्रा । देवा कृपेचा तूं समुद्रा ॥
वरदविनायक करुणागारा । अवघी विघ्ने नेसी विलया ॥३॥


श्री गणपतीची आरती 15

आरती करितो मी गणराया । गंध पुष्प धूप दीप अर्पितो तुला ॥
कुणी म्हणती गजवदना । एकदंत वक्रतुंड हे गजानना ॥
नाही स्मरलो क्षणही तुला । म्हणुनी आता शरण तुला आलो देवा ॥


श्री गणपतीची आरती 16

आरती मी करिन तुला श्रीगजानना ।
वक्रतुंड एकदंत मुषकवाहना ॥धृ.॥
त्रिविधताप दूर करी गौरीनंदना ।
दॆन्य हरुनि तारी मला विघ्ननाशना ॥
भक्तसखा तूंची एक सिंदुरानना ।
मी निशिदिनी ध्यातो तुला दुष्ट भंजना ॥१॥
पंचारती ओवाळिन पुरवि कमना ।
साह्य करीं निशिदिनि मज भक्तातारणा ॥
भाविक जन पुजिति तुला स्वहित साधना ।
वासुदेव लीन पदीं धरुनि धारणा ॥२॥


श्री शंकराची आरती 1

लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा ।
वीषे कंठी कला त्रिनेत्री ज्वाळा ।
लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा ॥१॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥धृ॥
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभूतीचे उधळण शितिकंठ निळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा । जय देव ॥२॥
देवी दैत्यी सागर मंथन पै केले ।
त्यामाजी अवचित हळहळ जें उठिले ।
तें त्वां असुरपणे प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले । जय ॥३॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासाअंतरी ॥ जय देव ॥ ४ ॥


श्री शंकराची आरती 2

कर्पूरगौरा गौरिशंकरा आरति करूं तुजला ।
नाम स्मरतां प्रसन्न होउनि पावसि भक्ताला ॥ धृ० ॥
त्रिशूळ डमरू शोभत हस्तीं कंठिं रुंडमाळा ।
उग्रविषातें पिऊनी रक्षिसी देवां दिक्पाळां ॥
तृतीय नेत्रीं निघती क्रोधें प्रळयाग्नीज्वाळा ।
नमिती सुरमुनि तुजला ऐसा तूं शंकर भोळा ॥ १ ॥
ढवळा नंदी वाहनशोभे अर्धांगीं गौरी ।
जटा मुकुटीं वासकरितसे गंगासुंदरी ॥
सदया सगुणा गौरीरमणा मम संकट वारीं ।
मोरेश्वरसुत वासुदेव तुज स्मरतो अंतरीं ॥ २ ॥


श्री शंकराची आरती 3

जय शंभो भोला नाथा । जय पार्वती रमणा शंभो ॥
अंकी गौरी विराजे । दुड दुड गणपती धावे ।
नंदीवरुनी आली स्वारी ॥
डम डम डमरु वाजे । व्याघ्रांबर कटी विलसे ।
नाचती भूतगण भोवती सारा ॥
कंठी फणीवर शोभे । चिता भस्म ते विलसे ।
झूळ झुळ गंगा माई वाहे ॥


श्री देवीची आरती 1

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।
वारी वारी जन्ममरणाते वारी ।
हरी पडलो आता संकट निवारी ॥१॥
जय देवी जय देवी महिषसूरमथिनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी ॥ धृ ॥
त्रिभुवन भुवनी पाहता तुजऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।
साही विवाद करिता पडिले प्रवाही ।
ते तू भक्तालागी पावसी लवलाही ॥ जय ॥ २ ॥
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ।
क्लेशापासुनि सोडावि तोडी भवपाषा ।
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा ।
नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा ।
जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक ॥ ३ ॥


श्री देवीची आरती 2

जगदंबेची मूर्ती पाहता । आईचा जय जयकार करा ॥
आई अमुची सौख्य दायीनी। शुंभ निशुंभ मारियले रणी।
पाप्यांना ती करिते शासन । भक्तांना आसरा ॥१॥
आईचा जयजयकार करा ...
हिरवी साडी हिरवी चोळी। करी कंकणे मालवत भाळी।
सुहास्य वदना प्रसन्न मूर्ती। सुखावितसे अंतरा ॥2॥
आईचा जयजयकार करा ...
कृपा असावी दिना वरती। तुझ्या दयेची मज आसक्ती।
आई आंबे तुला प्रार्थितो जोडूनी दोन्ही करा॥३॥
आईचा जयजयकार करा ...


श्री देवीची आरती 3

माझी रेणुका माउली। कल्पवृक्षाची साउली ।
जैसी वत्सालागी गाय तैसी अनाथांची माय ॥१॥
हाकेसरशी घाई घाई। वेगे धावतची पायी ।
आली तापल्या उन्हात। नाही आळस मनात ॥२॥
खाली बैस घे आराम। मुखावरती आला घाम ।
विष्णुदास आदराने। वारा घाली पदराने. ॥३॥


श्री देवीची आरती 4

आई माझी कोणाला पावली गो कोणाला पावली ॥
पावली कोली लोकायाला गो भांडारी लोकायाला ॥
आई माझी एकोरी एकोरी गो आई माझी एकोरी एकोरी॥
आई तुझी लोनावल्याची वाट गो लोनावल्याची वाट ॥
आई तुझा गुल्लालू डोंगर गो गुल्लालू डोंगर ॥
आई तुझा डोंगर कोणी बांधिला गो डोंगर कोणी बांधिला ॥
बांधिला पाच पांडवानी गो भीमा बांधवानी ॥
आई तुझ देऊळ कोणी बांधिले गो देऊळ कोणी बांधिले ॥
बांधिल पाच पांडवानी गो अर्जुन बांधवानी ॥
आई माझी कोंबर्यावर बैसली गो कोंबर्यावर बैसली ॥
आई तुला नवस काय काय बोलू गो नवस काय काय बोलू ॥

श्री देवीची आरती 5

गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा ॥धृ॥
हळद कुंकू घेऊन हाती । काळूबाईला विणवू किती ॥
देवीचा, काळूबाईचा मळवट भरवाना बायला सोसना गारवा ॥ १॥
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा ....
झोळी पातळ घेऊन हाती । काळूबाईला विणवू किती ॥
देवीचा, काळूबाईचा छविना मिरवाना बायला सोसना गारवा ॥ २॥
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा ....
लिंब नारळ घेऊन हाती । काळूबाईला विणवू किती ॥
देवीला, काळूबाईला चौकात फिरवाना बायला सोसना गारवा ॥ ३ ॥
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा ....
लहान थोर जमून येती । काळूबाईचं दर्शन घेती ॥
देवीची, काळूबाईची जत्रा भरवाना बायला सोसना गारवा ॥४॥
गार डोंगराची हवा न बायला सोसना गारवा ....


श्री देवीची आरती 6

अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी ।
मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागोनी ।
त्रिविध तापाची कराया झाडणी ।
भक्ता लागोनी लागोनी पावसी निर्वाणी ॥
आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन ॥१॥

द्वैत सारोनी सारोनी माळ मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन ।
भेद रहित रहित वारीस जा‌ईन ।
आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन ॥२॥

नवविध भक्तिच्या करुनी नवरात्रा ।
करोनी निराकरण कारण मागेन ज्ञानपुत्रा ।
दंभ सासरा सासरा संडीन कुपात्रा ।
करीन सद्भावे अंतरीच्या मुद्रा ॥
आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन ॥३॥

पूर्ण बोधाची बोधाची भरीन मी परडी ।
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन कुर्वंडीी ।
अद्भूत रसाची भरीन दुरडी ॥
आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन ॥४॥

आता साजणी साजणी झाले मी नि:संग ।
विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडीयला संग ।
काम क्रोध हे झोडियले मांग ।
केला मोकळा मोकळा मार्ग सुरंग ।
सत्‌चित आनंद आनंद झाले मी अभंग ॥
आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन ॥५॥

ऐसा जोगवा जोगवा मागून ठेविला ।
जावुनी महाद्वारी महाद्वारी नवस मी फेडीला ।
एका जनार्दनी जनार्दनी एकपणे देखिला ।
जन्म-मरणाचा मरणाचा फेरा हा चुकविला ॥
आ‌ईचा जोगवा जोगवा मागेन ॥६॥


श्री देवीची आरती 7

नवरात्राची आरती
आश्विनशुध्दपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो ।
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो ।
मूलमंत्रजप करुनी भोवते रक्षक ठेवुनी हो ।
ब्रम्हा विष्णू आईचे पूजन करिती हो ॥ १ ॥

उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ।
उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ धृ ॥

द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो ।
सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो ।
उदोकारे गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो । उदो ॥2॥

तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो ।
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो ।
कंठीची पदके कांसे पितांबर पिवळा हो ।
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो । उदो ॥ ३ ॥

चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो ।
उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणी हो ।
पूर्ण कृपे तारिसी जगन्माते मनमोहिनी हो ।
भक्तांच्या माउली सुर तें येती लोटांगणी हो । उदो ॥ ४ ॥

पंचमीचे दिवशी व्रत तें उपांगललिता हो ।
अर्ध्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तविती हो ।
रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो ।
आनंदे प्रेम तें आले सदभावे क्रीडता हो । उदो ॥ ५ ॥

षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो ।
घेउनी दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा हो ।
जोगवा मांगता प्रसन्न झाली भक्तकुळा हो । उदो ॥ ६ ॥

सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो ।
तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो ।
जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो ।
भक्त संकटी पडतां झेलुनी घेसी वरचेवरी हो । उदो ॥ ७ ॥

अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो ।
सह्याद्रीपर्वती राहिली उभी जगज्जननी हो ।
मन माझे मोहिले शरण आलो तुजलागुनी हो ।
स्तनपान देऊनी सुखी केलें अंत:करणी हो । उदो ॥ ८ ॥

नवमीचे दिवशी नवदिवसाचे पारणे हो ।
सप्तशतीजप होमहवने सदभक्तीकरुनी हो ।
षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो ।
आचार्य ब्राम्हणा तृप्त केलें कृपेकरुनी हो । उदो ॥ ९ ॥

दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लघनी हो ।
सिंहारूढ करी दारूण शस्त्रे अंबे त्वां घेउनी हो ।
शुंभनिशुभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो ।
विप्रा रामदासा आश्रम दिधला तो चरणी हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो ॥ १० ॥


श्री दत्ताची आरती 1

त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रिलोक्यराणा ।
नेति नेति शब्द नये अनुमाना ।
सुरवरमुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥
जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता ।
आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैची कळेल हे मात ।
पराही परतली तेथे कैचा हा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ॥ जय ॥ २ ॥
दत्त येउनिया उभा ठाकला ।
सद्भावें साष्टांगे प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥ जय ॥ ३ ॥
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हारपले मन झाले उन्मन ।
मी तू झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ जय देव ॥ ४ ॥
आरती सदगुरू 1

धन्य हे प्रदक्षिणा सदगुरूरायाची ।
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ॥ धृ ॥
गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी।
अनुभविते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी ॥ धन्य. ॥ १ ॥
पदो पदी झाल्या अपार पुण्याच्या राशी ।
सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी ॥ धन्य.॥ २ ॥
मृदंग टाळ घोषी भक्त भावार्थे गाती ॥
नामसंकीर्तने नित्यानंद नाचताती ॥ धन्य. ॥ ३ ॥
कोटीब्रह्महत्या हरती करितां दंडवत ।
लोटांगण घालितां ॥ मोक्ष लागे पायांता ॥ धन्य ॥ ४ ॥
प्रदक्षिणा करुनी देहभाव हरवीला ।
श्रीरंगात्मत विठ्ठल पुढे उभा राहिला । धन्य ॥ ५ ॥


आरती सदगुरू 2

फळलें भाग्य माझें धन्य झालों संसारी ।
सद्गुरु भेटला हो तेणें धरियेलें करीं ॥
पश्चिमे चालवीलें आत्मस्तुती निर्धारीं ।
त्रिकुटावरी नांद देखियेला पंढरी ॥ १ ॥
तें सुख काय सांगूं वाचे बोलता न ये ।
आरतिचेनि गुणे गेलें मीपण माये ॥ धृ ॥
राउळामार्जी जातां राहे देह अवस्था ।
मन हैं उन्मन झालें नसे बद्धतेची वार्ता ॥
हेतु हा मावळला शब्दा आली निःशब्दता ।
तटस्थ होऊनि ठेलों नीजरूप पहातां ॥ २॥
त्रिगुण गुण बाई पूर्ण जळत्या वाती ।
नवलाव अविनाश न समायें समंज्योती ॥
पाहतां लक्ष तेथें हालूं विसरली पातीं।
नातुडे माझें नाही दिवसराती ॥ ३ ॥
आरती सद्गुरुचि उजळली अंतरीं ।
प्रकाश थोर झाला सांठवेना अंबरी ॥
रविशशि मावळले तया तेजामाझारीं ।
वाजती दिव्य वाचें अनुहाते गजरी ॥ ४ ॥
आनंदसागरांत प्रेमें दीधली बुडी ।
लाधलें सौख्य मोठें न ये बोलीं ॥
सद्गुरुचेनि संगे ऐसी आरती केली ।
निवृत्तीनें आनंदाची तेथे वृत्ति निमाली ॥ ५॥


श्री विठोबाची आरती 1

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ॥
रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव जय देव ॥ धृ ॥
तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी । कांसे पितांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥ जय ॥ २ ॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नाने जें करिती ।
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती । केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥ जय ॥ ३ ॥
श्री विठोबाची आरती 2

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये । निढळावरी कर...
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहें ।
ठेवुनी वाट मी पाहें ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप । पंढरपुरी आहे...
पंढरपुरी आहे माझा मायबाप ।
हो माझा मायबाप ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥ १ ॥
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला । गरुडावरी बैसोनि ..
गरुडावरी बैसोनि माझा कैवारी आला ।
हो माझा कैवारी आला ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥ २ ॥
विठोबाचें राज्य आम्हा नित्य दिपवाळी । विष्णुदास नामा ..
विष्णुदास नामा जीवे भावें ओवाळी ।
हो जीवे भावें ओवाळी ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥ ३ ॥
असो नसो भाव आम्हां तुझिया ठायां । कृपादृष्टी पाहें ..
कृपादृष्टी पाहें माझ्या पंढरीराया ।
हो माझ्या पंढरीराया ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
येई हो विठ्ठले माझे माउली ये ॥ ४ ॥


श्री विष्णूची आरती 1

शेषाचल अवतार तारक तूं देवा ।
सुरवरमुनिवर भावें करिती जनसेवा ॥
कमळारमणा अससी अगणित गुणठेवा ।
कमळाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ॥ १ ॥
जय देव जय देव जय व्यंकटेशा ।
केवल करुणासिंधू पुरवीसी आशा ॥ ध्रु० ॥
हें निजवैकुंठ म्हणुनि ध्यातों मी तूतें ।
दाखविसी गुण कैसे सकळिक लोकांतें ॥
देखुनि तुझें स्वरूप सुख अद्भुत होतें ।
ध्यातां तुजला श्रीपति दृढ मानस होतें ॥ जय० ॥ २ ॥


श्रीरामाची आरती १

जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती, सद्भावे आरती, परिपूर्णकामा ॥ धृ० ॥

स्वस्वरूपोन्मुखबुद्धि वैदेही नेली ।
देहात्मकाभिमाने दशग्रीवे हरिली ।
शब्दरूप मारुतीने सच्छुद्धि आणिली ।
तव चरणांबुजी येऊन वार्ता श्रृत केली ।
जय देव जय देव निजबोधा रामा ॥ १ ॥

उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी ।
लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह अहंभाव रावण निवटोनी ॥ २ ॥

प्रथम सीताशोधा हनुमंत गेला ।
लंका दहन करुनी अखया मारिला ।
मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला ।
आनंदाची गुढी घेऊनिया आला ॥ ३ ॥

निजबळे निजशक्ति सोडविली सीता ।
म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा ।
आनंदे ओसंडे वैराग्य भरता ।
आरती घेऊनी आली कौसल्यामाता ॥ ४ ॥

अनाहतध्वनि गर्जती अपार ।
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।
अयोध्येसी आले दशरथकुमार ।
नगरीं होत आहे आनंद थोर ॥ ५ ॥

सहजसिंहासनी राजा रघुवीर ।
सोऽहंभावे तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदास स्वामी आठव ना विसर ॥ ६ ॥

मारुतीची आरती

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी ॥
कडाडिले ब्रम्हांड धाक त्रिभुवनी ।
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीहनुमंता ।
तुमचेनी प्रसादे न भी कृतांता ॥ धृ ॥
दुमदुमले पाताळ उठिला प्रतिशब्द ।
थरथरला धरणीधर मानिला खेद ।
कडकडिले पर्वत उद्दगण उच्छेद ।
रामी रामदासा शक्तीचा शोध ॥ जय ॥ २ ॥


कैवारी हनुमान, आमुचा ॥
पाठीं असतां तो जगजेठी । वरकड काय गुमान
नित्य निरंतर रक्षी नानापरी । धरूनिया अभिमान
द्रोणागिरि करि घेउनि आला । लक्ष्मणप्राणनिधान
दासानुदासा हा भरंवसा । वहातसे त्याची आण


श्री कृष्णाची आरती

ओवाळू आरती मदनगोपाळा । श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा ॥ धृ ॥
चरणकमल ज्याचे अति सुकुमार । ध्वजवज्रांकृश ब्रीदाचे तोडर ओवाळू ॥ १ ॥
नाभिकमल ज्याचे ब्रम्हयाचे स्थान । हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन । ओवाळू ॥ २ ॥
मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी । वेधले मानस हारपली दृष्टी । ओवाळू ॥ ३ ॥
जडित मुगुट ज्याचा देदिप्यमान । तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन । ओवाळू ॥ 4 ॥
एका जनार्दनी देखियले रूप । रूप पाहतां जाहले अवघे तद्रूप । ओवाळू ॥ ५ ॥


दशावतारांची आरती (Dashavatar Aarti )

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्त संकटिं नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ ध्रु० ॥
अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनियां देसी ॥
मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ आरती० ॥ १ ॥
रसातळासी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकरासाठीं देवा कांसव झालासी ॥
दाढें धरुनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी ।
प्रल्हादाकारणें स्तंभीं नरहरि गुरगुरसी ॥ आरती० ॥ २ ॥

पांचवे अवतारीं बळिच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनीं बळीला पाताळा नेसी ॥
सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरुनी बळिच्या द्वारीं तिष्ठसी ॥ आरती० ॥ ३ ॥

सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला ॥
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ आरती० ॥ ४ ॥

मातला रावण सर्वां उपद्रव केला ।
तेहतिस कोटी देव बंदी हरिलें सीतेला ॥
पितृवचनालागीं रामें वनवास केला ।
मिळोनि वानरसहित राजा राम प्रगटला ॥ आरती० ॥ ५ ॥

देवकीवसुदेवबंदीमोचन त्वां केलें ।
नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें ।
गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ आरती० ॥ ६ ॥

बौद्ध कलंकी कलियुगीं झाला अधर्म हा अवघा ।
सोडुनी दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा ॥
म्लेंच्छमर्दन करिसी ह्मणोनि कलंकी केशवा ।
बहिरवि जान्हवी द्यावी निजसुखानंदाची सेवा ॥ आरती० ॥ ७ ॥


आरती सत्यनारायण

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥
पंचारति ओवाळूं श्रीपति तुज भक्तिभावा ॥ ध्रु० ॥
विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण ॥
परिमलद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ॥
घृतयुक्तशर्करामिश्रित गोधूमचूर्ण ॥
प्रसाद भक्षण करितां तूं त्यां प्रसन्न नारायण ॥ जय० ॥ १ ॥
शतानंदे विप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें ॥
दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें मोक्षपदा नेलें ॥
त्यापासुनि हें व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें ॥
भावार्थें पूजितां सर्वां इच्छित लाधलें ॥ जय० ॥ २ ॥
साधुवैश्यें संततिसाठीं तुजला प्रार्थियलें ॥
इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें ॥
त्या पापानें संकटिं पडुनी दुःखहि भोगीलें ॥
स्मृति होउनि आचरितां व्रत त्या तुवांचि उद्ध्रिलें ॥ जय० ॥ ३ ॥
प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली ॥
क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ॥
अंगध्वजरायासी यापरि दुःखस्थिति आली ॥
मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णीं परिसीली ॥ जय० ॥४ ॥
पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणीं ॥
पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ॥
अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि ॥
ऐसा भक्तां संकटिं पावसी तूं चक्रपाणी ॥ जय० ॥ ५ ॥
अनन्यभावें पूजुनि हें व्रत जेजन आचरती ॥
इच्छित पुरविसि त्यांतें देउनि संतति संपत्ति ॥
संहरसी भवदुरितें सर्वहि बंधने तुटती ॥
राजा रंका समान मानुनि पावसि श्रीपती ॥ जय० ॥ ६ ॥
ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णूं मी कैसा ।
भक्तिपुरःसर आचरती त्यां पावसि जगदीशा ।
भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तूं सर्वेशा ॥
मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ॥ जय जय० ॥७॥


आरती नित्यानंद राया

जय जय आरती नित्यानंद राया । सगुणा रुपी गोविंदा ॥
प्रथम दत्त रूप घेसी । द्वितीय श्रीपाद होसी ।
तृतीय नरहरी बनसी । गाणगापुरी लीला दाविसी ॥1॥
जय जय आरती नित्यानंदा ...
माणिक प्रभू तू होसी । अक्कलकोट स्वामी तू होसी ।
शिर्डी साईनाथ होसी । कलियुगी नित्यानंद बनसी ॥2॥
जय जय आरती नित्यानंदा ...
वो ऐसे अनेक रूप तू घेसी| कणकवली भालचंद्र होसी।
शेगावी गजानन होसी । गणेश पुरी तू वससी।
बाळाना बहु आवडसी । त्या बाळांच्या इच्छा पुरविसी॥3॥
जय जय आरती नित्यानंदा...


आरती गजानन महाराज

जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया।
अवतरलासी भूवर जड मुढ ताराया॥जयदेव जयदेव

निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी।
स्थिरचर व्यापून उरलें जे या जगताशी॥
तें तूं तत्त्व खरोखर निःसंशय अससी।
लीलामात्रें धरिलें मानव देहासी॥जयदेव जयदेव

होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा।
करूनी गणि गण गणांत बोते या भजना॥
धाता हरिहर (नरहरी) गुरुवर तूंचि सुखसदना।
जिकडें पहावे तिकडे तूं दिससी नयना॥जयदेव जयदेव

लीला अनंत केल्या बंकट सदनास।
पेटविलें त्या अग्नीवाचूनी चिलमेस॥
क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस।
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश॥जयदेव जयदेव

व्याधी वारून केलें कैकां संपन्न।
करविले भक्तालागी विठ्ठल दर्शन॥
भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण।
स्वामी दासगणूचे मान्य करा कवन॥जयदेव जयदेव

आरती साईबाबा

आरती साईबाबा । सौख्यदातारा जीवा।
चरणरजतळीं । द्यावा दासां विसांवा, भाक्ता विसावा ॥ ध्रु० ॥
जाळुनियां अनंग । स्वस्वरूपीं राहे दंग ।
मुमुक्षु जनं दावी । निज डोळां श्रीरंग ॥ आरती० ॥ १ ॥
जया मनीं जैसा भाव । तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाधना । ऐसी तुजी ही माव ॥ आरती० ॥ २ ॥
तूमचें नाम ध्यातां । हरे संसृतिव्यथा ।
अगाध तव करणी । मार्ग दावीसी अनाथा ॥ आरती० ॥ ३ ॥
कलियुगीं अवतार । सगुणब्रह्म साचार ।
अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ॥ आरती० ॥ ४ ॥
आठां दिवसां गुरुवारीं । भक्त करिती वारीं ॥
प्रभुपद पहावया । भवभय निवारी ॥ आरती० ॥ ५ ॥
माझा निजद्रव्य ठेवा । तव चरणरजसेवा ।
मागणें हेंचि आतां । तुम्हां देवधिदेवा ॥ आरती० ॥ ६ ॥
इच्छित दीन चातक । निर्मल तोय निजसुख ।
पाजावें माधवा या । सांभाळ आपुली भाक ॥आरती०॥७॥


श्री ज्ञानदेवाची आरती

आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत ॥ मनु वेधला माझा ॥ आरती ॥ धृ ॥
लोपलें ज्ञान जगी । हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग । नाम ठेविले ज्ञानी ॥ १ ॥
प्रकट गुह्य बोले । विश्र्व ब्रम्हाची केलें ।
रामजनार्दनी । पायी मस्तक ठेविले ।
आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा ॥ सेविती ॥ 2 ॥


श्री तुकारामाची आरती

आरती तुकारामा । स्वामी सदगुरूधामा ।
सच्चिदानंदमूर्ती । पाय दाखवी आम्हा ॥ आरती ॥ धृ ॥
राघवे सागरांत । पाषाण तारिले ।
तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकी रक्षिले ॥ आरती ॥ १ ॥
तुकिता तुलनेसी । ब्रम्ह तुकासि आलें । म्हणुनी रामेश्वरे ।
चरणी मस्तक ठेविले ॥ आरती तुकारामा ॥ २ ॥


श्री एकनाथाची आरती

आरती एकनाथा । महाराजा समर्था ।
त्रिभुवनी तूंचि थोर । जगदगुरू जगन्नाथा ॥ धृ ॥
एकनाथ नाम सार । वेदशास्त्रांचे गूज ।
संसारदु:ख नाम । महामंत्राचे बीज । आरती ॥ १ ॥
एकनाथ नाम घेतां । सुख वाटले चित्ता ।
अनंत गोपाळदासा । धणी न पुरे गातां ।
आरती एकनाथा । महाराजा समर्था ॥ २ ॥


श्री रामदासाची आरती

आरती रामदासा । भक्त विरक्त ईशा ।
उगवला ज्ञानसूर्य ॥ उजळोनी प्रकाशा ॥ धृ ॥
साक्षात शंकराचा । अवतार मारुती ।
कलिमाजी तेचि झाली । रामदासाची मूर्ती ॥ १ ॥
वीसही दशकांचा । दासबोध ग्रंथ केला ।
जडजीवां उद्धरिले नृप शिवासी तारीले ॥ २ ॥
ब्रम्हचर्य व्रत ज्याचे । रामरूप सृष्टी पाहे ।
कल्याण तिही लोकी । समर्थ सद्गुरुपाय ॥ ३ ॥ आरती रामदासा ॥


झाले समाधान । तुमचे देखिले चरण ।। १ ।।
आता ऊठावेसे मना । येत नाही नारायणा ।। २ ।।
सुरवाडीकपणे । येथे सापडले केणे ।। ३ ।।
तुका म्हणे भोग। गेला निवारला लाग ।।४।।


करुनी आरती । चक्रपाणी ओवाळीती ।।१।।
आजी पुरले नवस । धन्य काळ हा दिवस ।।२।।
पहा ओ सकळा । पुण्यवंता तुम्ही बाळा ।।३।।
तुका वाहे टाळी । उभा सन्निध जवळी ।।४।।


प्रेम सप्रेम आरती । गोविंदाते ओवाळीती ।।१।।
धन्य धन्य ते लोचन । नित्य करिती अवलोकन।।२।।
बाळा पौढा आणि मुग्धा । ओवाळिती परमानंदा।।३।।
नामा म्हणे केशवाते । देखोनि राहिलो तटस्थे ।।४।।


घालीन लोटांगण वंदीन चरण

घालीन लोटांगण वंदीन चरण॥ डोळ्यांनी पाहीन रूप तुझें॥
प्रेमें आलिंगन आनंदे पूजिन॥ भावें ओवाळीन म्हणे नामा॥
त्वमेव माता च पिता त्वमेव॥ त्वमेव बंधुश्‍च सखा त्वमेव॥
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव॥ त्वमेव सर्वं मम देवदेव॥
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा॥ बुद्धात्मना व प्रकृतिस्वभावअत्‌॥
करोमि यद्‌त्सकलं परस्मै॥ नारायणायेति समर्पयामि।
अच्युतं केशवं रामनारायणं॥ कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्‌॥
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं॥ जानकीनायकं रामचंद्रं भजे॥
हरे राम हरे राम राम राम हरे हरे॥
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।


आकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझिया सकाळ हरीच्या दासा |
कल्पनीची बाधा न होणे काळी हे संत मंडळी सुखी असो |
अहंकाराचा वर न लगो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी |
नाम म्हणे तया असावेम कल्याण ज्या मुखी निधन पांडुरंग 


मोरया मोरया अष्टविनायक मोरया ॥
मोरया मोरया मयूरेश्वर मोरया ॥
मोरया मोरया चिंतामणि मोरया॥
मोरया मोरया बल्लालेश्वर मोरया॥
मोरया मोरया वरदविनायक मोरया॥
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया॥
मोरया मोरया विग्नेश्वरा मोरया॥
मोरया मोरया महगणपती मोरया॥
मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया॥
मोरया मोरया अष्टविनायक मोरया॥


सदा सर्वदा योग तूझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा ॥
उपेक्षू नको गूणवंता अनंता । रघूनायका मागणे हेचि आतां ॥१॥
कैलास राणा शिव चंद्रमौळी । फणींद्र माथा मुकुटी झळाळी ॥
कारुण्य सिंधू भवदु:खहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२॥
मोरया मोरया मी बाळ तान्हें । तुझीच सेवा करु काय जाणे ॥
अन्याय माझे कोट्यानुकोटी । मोरेश्वरा ब तू घाल पोटी ॥३॥
ज्या ज्या ठीकांणी मन जाय माझे । त्या त्या ठीकांणी निजरुप तुझे ॥
मी ठेवितो मस्तक ज्या ठीकांणी । तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥४॥
अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र । तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ॥
तया आठविता महापुण्यराशी । नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ॥५॥


अष्टविनायक नमन
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।
बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।
लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम ।
ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान॥


मंत्रपुष्पांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ॥
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने ।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय ।
महाराजाय नम: ।
ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्यायीस्यात् सार्वभैम: सार्वायुष आं
तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति
तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो मरूतस्यावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ॥
एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नोदंती प्रचोदयात् ।
मंत्रपुष्पांजली समर्पयामि ॥
॥ गणपतिबाप्पा मोरया ।
॥ मंगलमूर्ती मोरया ।


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers