Showing posts with label काय त्यांचा महिमा वाणू वारंवार संत निळोबा ▌♫▐. Show all posts
Showing posts with label काय त्यांचा महिमा वाणू वारंवार संत निळोबा ▌♫▐. Show all posts

काय त्यांचा महिमा वाणू वारंवार | Kay tyancha mahima vaanu varamvaar - संत निळोबा ▌♫▐

काय त्यांचा महिमा वाणू वारंवार ।
हरिभक्त थोर भूमंडळीं ॥१॥
ज्याचिये भेटीचे आर्त ब्रम्हांदिका ।
पूज्य सकळ लोकां विश्वा झालें ॥२॥
यमधर्म वास पाहे नित्य काळ ।
म्हणे धन्य वेळ भेटती ते ॥३॥
निळा म्हणे सर्व भाग्यें चोजविती ।
रिध्दिसिध्दि येती वोळंगणे ॥४॥

Kay tyancha mahima vaanu varmvar ।
Haribhakt thor bhumandali ॥१॥
Jyachiye bhetiche aart bramhadika ।
Pujya sakal loka vishva zale ॥2॥
Yamdharm vaas pahe nitya kaal ।
Mhane dhanya vel bhetati te ॥3॥
Nila mhane sarv bhagye chojaviti । Ridhhisidhhi yeti volangane ॥4॥




Labels

Followers