अकारी अर्धामात्रा कवण रीति दिसे ।


अकारी अर्धामात्रा कवण रीति दिसे । उकारीही घसे कवणे परी ॥१॥
मकारी संयुक्त झाली कैशापरी । अर्धमात्रेवरी अर्धमात्रा ॥२॥
अर्धमात्रेचा अर्थ अवचटची दिसे । गुरुगम्य सोय जाणती पैं ॥३॥
ज्ञानदेवें अर्थ शोधुनी घेतला । महाशून्यीं संचला निवृत्तीराज ॥४॥





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers