अंगा लावुनियां राख । करी भलतेंची पाप

अंगा लावुनियां राख । करी भलतेंची पाप ॥१॥
मेळवी शिष्यांचा मेळा । अवघा भांगेचा घोंटाळा ॥२॥
नानापरी सांगे मंत्र । नेणें विधीं अपवित्र ॥३॥
न कळे ज्ञानाची हातवटी । सदां परदार राहाटी ॥४॥
एका जनार्दनीं सोंग । तेथें नाहीं पांडुरंग ॥५॥

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers