अंगावरी आलिया घाव । अवघा देव निवारी ॥

अंगावरी आलिया घाव । अवघा देव निवारी ॥१॥
काया वाचा शरण आतां । नुपेक्षी अनाथा विठ्ठल ॥२॥
मुख्य आधीं पाहिजे भाव । तेणें देव कव घाली ॥३॥
एका जनार्दनीं भावापाठीं । धावें उठाउठी देव मागें ॥४॥

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers