अचुक साधन कष्ट नाहीं कांहीं ।

अचुक साधन कष्ट नाहीं कांहीं ।
वाचे विठ्ठलरखुमाई म्हणे सुखें ॥१॥
जन्ममरणाच्या तुटतील खेपा ।
सोपा होय बापा मार्ग तुज ॥२॥
बहुत मार्ग बहुत साधन ।
परी वाचा जाण शीण दुर्गम तें ॥३॥
एका जनार्दनीं कष्ट ना सायास ।
म्हणा वाचे विठ्ठलास जीवेंभावें ॥४॥

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers