अजानवृक्षांची पानें जाण ।

अजानवृक्षांची पानें जाण । जो भक्षून करील अनुष्ठान ।
त्यासी साध्य होईल ज्ञान । येथें संशय नाहीं ॥१॥
ज्ञानेश्वरी तीन सप्तकें । जो श्रवण करील विवेकें ।
तो होय ज्ञानी अधिकें । येथें संशय नाहीं ॥२॥
मणिकर्णिका भागीरथी । इंद्रायणीचे स्नान करिती ।
ते मोक्षपदासी जाती । येथे संशय नाहीं ॥३॥
अश्वत्थ सिध्देश्वर । समाधीसी करी नमस्कार ।
तो पावे मोक्ष पैं सार । येथें संशय नाहीं ॥४॥
येथींचे वृक्षपाषाण । ते अवघे देव जाण ।
म्हणे एका जनार्दन । येथें संशय नाहीं ॥५॥

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers