अग्नीस आपदा बहुवस ।

अग्नीस आपदा बहुवस । रावणाचे असोस ।
नानापरीचे स्पर्शदोष । धूई अहर्निशीं धुपधुपीत ॥१॥
उदक सेवा वरुणा हातीं । विंजणें सेवा नित्य वसती ।
निरोप सांगावया बृहस्पती । प्रजापती शांतिपाठा ॥२॥
ऐसे आम्हीं देव समस्त । रावणाचे नित्यांकित ।
लंके आलिया रघुनाथ । एका जनार्दनीं बंधमुक्त करील ॥३॥

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers