अंतरशुद्धीचें कारण । वाचे करा हरिकीर्तन ॥

अंतरशुद्धीचें कारण । वाचे करा हरिकीर्तन ॥१॥
देवा आवडी कैसी । धेनु धांवे वत्सा जैसी ॥२॥
कीर्तनीं तारिला गणिका । नामस्मरणें मोक्ष देखा ॥३॥
किर्तनीं तारिली गणिका । नामस्मरणें मोक्ष देखा ॥४॥
ऐशी कीर्तनाची गोडी । एका जनार्दनीं घाली उडी ॥५॥

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers