अंगीं जया पुर्ण शांती । वाचा रामनाम वदती ।

अंगीं जया पुर्ण शांती । वाचा रामनाम वदती ।
अनुसरले चित्तवृत्तीं । संतचरणीं सर्वदा ॥१॥
घडो तयांचा मज संग । जन्ममरणाचा फिटतसे पांग ।
आधिव्याधि निरसोनी सांग । घडतां संग वैष्णवांचा ॥२॥
जें दुर्लभ तिहीं लोकां । आम्हां सांपडलें फुका ।
एका जनार्दनीं घोका । नाम त्यांचे आवडी ॥३॥

Labels

Followers