अभंग : अनतांचे अनंत गुण

अनतांचे अनंत गुण । अपार पार हें लक्षण ।
तो समचरण ठेवुन । विटे उभा राहिला ॥१॥

करीं दास्यत्व काळ । भक्तजनां प्रतिपाळ ।
उदार आणि स्नेहाळ । तो उभा भीवरे ॥२॥

धीर सर्वस्वे बळसागर । निद्रा करी शेषावर ।
लक्ष्मी समोर । तिष्ठत सर्वदा ॥३॥

खेळे कौतुकें खेळ । तोडी भक्तांचे मायाजाळ ।
एका जनार्दनीं कृपाळ । स्वामीं माझा विठ्ठल ॥४॥

Labels

Followers