अभंग : देव भुलला भावासी ।

देव भुलला भावासी । सांडोनियां वैकुंठासी ॥१॥
उघडा आला पंढरपुरा । तो परात्पर सोइरा ॥२॥
पाहूनियां पुंडलिका । भुलला तयाच्या कौतुका ॥३॥
उभा राहिला विटेवरी । एका जनार्दनीं हरी ॥४॥

Labels

Followers