अभंग : राम म्हणतां रामचि होइजे

राम म्हणतां रामचि होइजे। पदिं बैसोनि पदवी घेइजे ॥१॥
ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहे ॥२॥
रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवी ॥३॥
तुका म्हणे चाखोनि सांगे । मज अनुभव आहे अंगें॥४॥

Labels

Followers