आम्ही नामाचे धारक | Amhi namache dharak - संत तुकाराम ▌♫▐

आम्ही नामाचे धारक नेणो प्रकार आणीक ।
सर्व भावे एक विठ्ठल चि प्रमाण ॥१॥
न लगे जाणावे नेणावे गावे आनंदे नाचावे ।
प्रेमसुख घ्यावे वैष्णवांचे संगती ॥ध्रु.॥
भावबळे घालू कास लज्जा चिंता दवडू आस ।
पायीं निजध्यास म्हणो दास विष्णूचे ॥२॥
भय नाही जन्म घेता मोक्षपदा हाणो लाता ।
तुका म्हणे सत्ता धरू निकट सेवेची ॥३॥


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers