राम माझी माये कै भेटईल

राम माझी माये कै भेटईल । वोरसें देईल आळिंगन ॥१॥
संसारीचें दुःख दाटलें मानसीं । तें मी तुजपासीं सांगईन ॥२॥
उतावेळ चित्त उभारूनी बाहे । रामदास पाहे वाट तुझी ॥३॥



Labels

Followers