जेथें नाहीं कांहीं नाम रूप गुण

जेथें नाहीं कांहीं नाम रूप गुण । बोलती निर्गुण तया-लागीं ॥१॥ तोचि गोकुळांत होऊनि गोंवळ । झणवितो बाळ यशो-देचा ॥२॥ चिन्मय चिद्रूप अक्षय अपार । अपार परेहूनि पर ह्मणती ज्यातें ॥३॥ सर्वां भूतांचे फुटकाये खोळें । भरलें न गळे आत्मपणें ॥४॥ आनंदी आनंद मातला अपार । वेदालाही पार नाही ज्याचा ॥५॥ नामा ह्मणे सर्व रूपें जें रूपस । गोकुळीं विलास मांडियेला ॥६॥

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers