अभंग : अदृष्टी असेल जें जें वेळे

अदृष्टी असेल जें जें वेळे । तें तें मिळेल तें तें काळें ॥१॥
ऐशी प्रारब्धाची गती । ब्रह्मादिकां न चुकतीं ॥२॥
जें जें होतें ज्या संचितीं । ते तयासवें चालती ॥३॥
जैशी जैशी कर्मरेषा । तैसें भोगणें सहसा ॥४॥
एका जनार्दनीं भोग । भोगविल्याविण न चुके सांग ॥५॥

Labels

Followers