नेणें भक्ति कांहीं करुं कैसी सेवा

नेणें भक्ति कांहीं करुं कैसी सेवा ।
हें तों मज देवा समजेना ॥१॥
करूं कैसा जप करूं कैसें ध्यान ।
नाहीं माझें मन स्थिर देवा ॥२॥
कामक्रोध यांची मोठी हे जाचणी ।
जालों वेडयावाणी समजेना ॥३॥
नामा म्हणे माझे सांवळे विठाई ।
येऊनियां राही ह्रदयामाजीं ॥४॥

Labels

Followers