अभंग : अनंत नामाचा हा काला

अनंत नामाचा हा काला । पुराणें म्हणते पाहुं चला ॥१॥
हरिनामाचा कवळू घेतां। तेणें धालों पैअ सर्वथा ॥२॥
एका कवळासाठीं । गणीका बैसविली वैकुंठीं ॥३॥
एका जनार्दनीं कवळ । सेवुं जाणती ते प्रेमळ ॥४॥

Labels

Followers