कांहीं उपाय चालेना ।

कांहीं उपाय चालेना । कांहीं स्वहित घडेना ॥ १ ॥
कांहीं केलें नाहीं पुण्य । काय जन्मासी येऊन ॥ २ ॥
केलीं नाहीं कांही भक्ती । देही नाहीं हो विरक्ती ॥ ३ ॥
कांहीं केलें नाहीं तीर्थ । जन्म गेला अवघा व्यर्थ ॥ ४ ॥
व्यर्थ प्रपंच हा केला । अवघा शेवटीं वायां गेला ॥ ५ ॥
गुरु कृप होय जरी । नरहरी क्षणांत उद्धरी ॥ ६ ॥





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers