काय तुझी थोरी वर्णूं मी पामर ।

काय तुझी थोरी वर्णूं मी पामर । होसी दयाकर कृपानिधी ॥ १ ॥
तुजसरशी दया नाहीं आणिकासी । असे ह्रषीकेशी नवल एक ॥ २ जन हो जोडी करा नाम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवासी ॥ ३॥
नरदेही साधन समता भावभक्ति । निजध्यास चित्तीं संतसेवा ॥ ४ ॥
गुरुपदीं निश्चळ परब्रह्म पाहे । नरहरी राहे एकचित्तें ॥ ५ ॥





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers