समर्थांचे उणे सेवका मरण

समर्थांचे उणे सेवका मरण । तेणे गुणे शीण होत असे ॥१॥
संसारीचे दुःख सांडुनीया आता । मज तुझी चिंता वाटतसे ॥२॥
पतीतपावन नाम कैसें राहे । कासाविस होये जीव माझा ॥३॥
रामदास म्हणे भलतें करावें । आधीं उद्धरावे सेवकासी ॥४॥



Labels

Followers