माझें सर्व जावो तुझें नाम राहो

माझें सर्व जावो तुझें नाम राहो । हाची माझा भावो अंतरीचा ॥१॥
पतीतपावन नाम हे जाईल । मग कोण राहिल तुजपासीं ॥२॥
यालागी राघवें भक्ता उद्धरावें । आपुलें राखावें ब्रीद देवा ॥३॥
रामदास म्हणे देवा तुझी आण । ब्रीदासाठीं प्राण देईजेतो ॥४॥




Labels

Followers