अभंग : आम्ही ज्याचे दास । त्याचा पंढरिये वास ॥

आम्ही ज्याचे दास । त्याचा पंढरिये वास ॥१॥
तो हा देवांचा ही देव । काय कळिकाळाचा भेव ॥ध्रु.॥
वेद जया गाती । श्रुति म्हणती नेति नेति ॥२॥
तुका म्हणे निज । रूपडें हें तत्वबीज ॥३॥

Labels

Followers