ॐ नमोजी सदाशिवा

ॐ नमोजी सदाशिवा । ब्रह्मादिकांन कळे लाघवा ।
तुम्हीं स्वामी देवाधिदेवा । ध्यान करितासां कवणाचें ॥१॥
ऐक रमणीय पार्वती त्रैलोक्यांत ज्याची कीर्ति ।
पुराण वेद जया वानिती । तो श्रीपती ध्योतीं मी ॥२॥
आवड कीर्तन चित्ती । रंगीं नाचतो जया वैकुंठपति ।
माझी धांव तेथें निश्चिती । ते सुखविश्रांती काय सांगूं ॥३॥
भाळे भोळे हरीचे दास । कीर्तनरंगीं नाचती उदास ।
त्यांच्या भार वाहें मी सर्वेश । उणे तयांस येऊं नेदीं ॥४॥
ऐसा अनुवाद कैलासगिरीं । गिरिजेसी सांगे त्रिपुरारी ।
एका जनार्दनीं सत्य निर्धारी । कीर्तनगजरीं उभे तिन्हीं देव ॥५॥

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers