अगाध तुझीं लीला आकळ कैसेनी कळे ।

अगाध तुझीं लीला आकळ कैसेनी कळे ।
ब्रह्मा मुंगी धरूनी तुझें स्वरुप सांवळें ॥१॥
तुज कैसे भजावें आपणां काय देखावें ।
तुजपाशीं राहुनी तुजला कैसें सेवावें ॥२॥
अंगा देव तुं आम्हां म्हणसी मानवी ।
हेम अलंकार वेगळे निवडावे केवीं ॥३॥
एका जनार्दनीं सबाह्मभ्यंतरीं नांदे ।
मिथ्या स्वप्नजात जेवीं जाय तें बोधे ॥४॥

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers