अभंग : माझें माहेर पंढरी । विठ्ठल उभा विटेवरी ॥१॥

माझें माहेर पंढरी । विठ्ठल उभा विटेवरी ॥१॥
संत मिळाले अपार । करिताती जयजयकार ॥२॥
टाळघोष पताका । नाचताती वैष्णव देखा ॥३॥
विठ्ठल नामें गर्जती । प्रेमभरीत नाचती ॥४॥
एका जनर्दनीं शरण । विठ्ठलनामें लाधें पूर्ण ॥५॥

Labels

Followers