ॐकार सह मकार आदि अंत नाहीं जया ।

ॐकार सह मकार आदि अंत नाहीं जया ।
तें पुंडलिक भुलवोनि आणिलें या ठायां ॥१॥
भुललें वो माय पुंडलिकांप्रीतीं ।
उभाचि राहे परी खेद न करी चित्तीं ॥२॥
अथरा पुराणांसी वाडशास्त्रें वेदादती ॥
तो सांवळा श्रीकृष्ण उभा विटे पुंडलिकाचे भक्ति ॥३॥
वेद वेदांतरें मत मतांतरें न कळे श्रुती पैं वेवादती ।
तो एका जनार्दनांचे ह्रुदयी सांवळा घेउनि बुंथीं ॥४॥

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Labels

Followers