तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे | Tuj Sagun Mhanu ki Nirgun re

तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदुरे ॥१॥
अनमाने ना अनुमाने ना । श्रृति नेति नेति म्हणती गोविंदु रे ॥२॥
तुज स्थुळ म्हणों कीं सुक्ष्म रे । स्थूळ सूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥
तुज आकारु म्हणों कीं निराकारु रे । आकारु निराकारु एकु गोविंदु रे ॥४॥
तुज दृश्य म्हणों कीं अदृश्य रे । दृश्य अदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥
निवृत्ति प्रसादे ज्ञानदेव बोले । बापरखुमादेविवरु विठ्ठलु रे ॥६॥

Labels

Followers