पैल तो गे काऊ कोकताहे

>पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगतसे ॥१॥
उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानें मढीन पाऊ ।
पाहुणे पंढरीराऊ घरां कैं येती ॥२॥
दहिभाताची उंडी लावीन तुझ्या तोंडीं ।
जीवापढीये त्याची गोडी सांग वेगीं ॥३॥
दुधें भरुनी वाटी लावीन तुझे ओठीं ।
सत्य सांगें गोठी विठो येईल काई ॥४॥
आंबया डाहाळीं फ़ळें चुंबीं रसाळीं ।
आजिचे रे काळीं शकुन सांगें ॥५॥
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे ।
भेटती पंढरीराणे शकुन सांगे ॥६॥

Labels

Followers