माझी कोण गती सांगा पंढरीनाथ | Mazi kon gati sanga pandhari natha ▌♫▐

माझी कोण गती सांगा पंढरीनाथा। तारीसि अनाथा केव्हां मज॥1॥
मनापासूनीया सांगा मजप्रती। पुसें काकुळती जीवाचिया॥2॥
न बोलसी कांरे धरीला अबोला । कोणासी विठ्ठला शरण जाऊं॥3॥
कोणासी सांकडे घालावें हें सांग । नको धरूं राग दीनावरी॥4॥
बाळकासी जैसी एकची ते माय । तैसे तुझे पाय मजलागीं ॥5॥
नामा म्हणे देवा अनाथाच्या नाथा । कृपाळूवा कांता रखुमाईच्या ॥6॥






Labels

Followers