धन्य झालो हो संसारी आम्ही देखिली पंढरी
धन्य झालो हो संसारी । आम्ही देखिली पंढरी ॥१॥चंद्रभागे करूं स्नान । पुंडलीकाचें दर्शन ॥ध्रु.॥
करूं क्षेत्रप्रदक्षिणा। भेटूं सत या सज्जनां ॥२॥
उभे राहूं गरुडपारीं । डोळेंभरुनी पाहों हरी ॥३॥
तुका म्हणे वाळवंटीं । महालाभ फुकासाटीं ॥४॥
स्वामी कृपा कधी करणार
स्वामी कृपा कधी करणार स्वामी कृपा कधी करणार तव चरणांचे दर्शन आता मला कधी घडणार ॥१॥मी अपराधी पापी तापी अहंकार युत अन संतापी दीन पतीत या तव बाळाला उरी कधी धरणार ॥2॥
मद मदनाची जोडी नामी व्यवहारी मन जडले कामी अज्ञानाचा तिमिर हराया सूर्य कधी बनणार ॥3॥
स्वामी राया ,माझी काया आतुर झाली,तुम्हा पहाया याया आता उशीर कासया दर्शन कधी देणार ॥4॥
नको नको मना गुंतुं मायाजाळी
नको नको मना गुंतुं मायाजाळीं । काळ आला जवळीं ग्रासावया ॥१॥काळाची ही उडी पडेल बा जेव्हां । सोडविना तेव्हां मायबाप ॥२॥
सोडविना बंधु पाठिची बहिण । शेजेची कामीन दुर राहे ॥३॥
सोडविना राजा देशीचा चौधरी । आणिक सोइरीं भलीं भलीं ॥४॥
तुका म्हणे तुला सोडविना कोणी । एका चक्रपाणिवांचूनियां ॥५॥
सुंदर माझें जातें गे फ़िरे बहुतेकें
सुंदर माझें जातें गे फ़िरे बहुतेकें । ओव्या गाऊं कौतुकें तूं येरे बा विठ्ठला ॥१॥जीव शिव दोनी खुंटे गे प्रपंचाचे नेटें गे । लावुनि पांची बोटें गे तुं ये रे बा विठ्ठला ॥२॥
सासु आणि सासरा दीर तो तिसरा । ओव्या गाऊं भ्रतारा तूं येरे बा विठ्ठला ॥३॥
बारा सोळा गडणी अवघ्या कामिनी । ओव्या गाऊं बैसूनि तूं येरे बा विठ्ठला ॥४॥
प्रपंच दळण दळिलें पीठ भरिलें । सासुपुढें ठेविलें तूं येरे बा विठ्ठला ॥५॥
सत्वाचें आधण ठेविलें पुण्य़ वैरिलें । पाप तें उतूं गेलें तूं येरे बा विठ्ठ्ला ॥६॥
जनी जातें गाईल कीर्त राहील । थोडासा लाभ होईल तूं येरे बा विठ्ठला ॥७॥
सात पांच तीन दशकांचा मेळा
सात पांच तीन दशकांचा मेळा । एक तत्त्वी कळा दावी हरी॥१॥तैसें नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती॥२॥
अजपा जपणें उलट प्राणाचा । येथेंही मनाचा निर्धार असे॥३॥
ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला॥४॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी॥
बाबा अहंकार निशी घनदाट
बाबा अहंकार निशी घनदाट ॥ गुरु वचनी फुटली पहाट ॥भक्ती माता भेटकी बर वंट ॥ तीनें मार्ग दाखविला चोखाट गा ॥१॥
नर हरि रामा गोविंदा वासुदेवा ॥ एक बोला सस्पष्ट बोलवा ॥
वाचें हरिहरि म्हणावा ॥ संत समागमू धरावा ॥ तेणें ब्रह्मानंद होय आधवा गा ॥२॥
आला शीतळ शांतीचा वारा ॥ तेणें सुख झाले शरीरा ॥
तुटला पातकांचा थारा ॥ काळेकाळासी धाक दरारा गा ॥३॥
अनुहत वाजती टाळ ॥ अनुक्षर गीत नृत्य रसाळ ॥
अनुभव तन्मय सकळ नामा ह्मणें केशव कृपाळू गा ॥४॥ ॥धृ०॥
तुझिये निढळीं कोटि चंद्र-प्रकाशे
तुझिये निढळीं कोटि चंद्र-प्रकाशे । कमल-नयन हास्य-वदन हांसे ॥१॥कृष्णा हाल कां रे कृष्णा डोल कां रे । घडिये घडिये गूज बोल कां रे ॥२॥
उभा राहोनियां कैसा हालवितो बाहो । बाप रखुमादेविवरु विठ्ठलु नाहो ॥३॥
योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी
योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी।पाहता पाहता मना न पुरे धणी ।।1।।
देखिला देखिला माये देवांचा देवो ।
फिटला संदेहो निमाले दुजेपण ।।धृ।।
अनंत रुपे अनंत वेषे देखिला म्या त्यासी ।
बापरखुमादेवीवरु खुण बाणली कैसी ।।3।।
हरिचिया दासा हरी दाही दिशा
हरिचिया दासा हरी दाही दिशा । भावे जैसा तैसा हरी तया ॥१॥हरी मुखी गातां हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥२॥
जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झालीं अंगे हरिरुप ॥३॥
हरिरुप झालें जाणणे हरपले । नेणणें ते गेलें हरिचे ठायीं ॥४॥
हरिरुप ध्यांनीं हरिरुप मनीं । एका जनार्दनी हरी बोला ॥५॥
धन्य जालों हो संसारीं
धन्य जालों हो संसारीं । आम्ही देखिली पंढरी ॥१॥चंद्रभागे करूं स्नान । पुंडलीकाचें दर्शन ॥ध्रु.॥
करूं क्षेत्रप्रदक्षिणा। भेटूं सत या सज्जनां ॥२॥
उभे राहूं गरुडपारीं । डोळेंभरुनी पाहों हरी ॥३॥
तुका म्हणे वाळवंटीं । महालाभ फुकासाटीं ॥४॥
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.